आणि मी व्यसनमुक्त झालो…

भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्यसन हे असतेच. मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना. व्यसनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने धुम्रपान करणे, मद्यपान करणे, इंजेक्शनच्या हे आणि ह्या स्वरुपातील व्यसन. काही वाईट व्यसन असतात, तर काहींना चांगले देखील व्यसन असतात. यामध्ये प्रामुख्याने म्हणायच तर व्यायाम करुन उत्तम शरीरयष्टी कमविण्याच व्यसन, सातत्याने वाचन, लिखाण करण्याच व्यसन असे विविध प्रकारचे चांगले सवय देखील असते. व्यसन करण्याच प्रमाण पुरुषामध्येच सर्वात जास्त असले तरी याला अपवाद महिलांचेही प्रमाण हल्लीच्या काळात वाढताना आढळतेय.

मी पण कधीकाळी व्यसनाधीनतेने बरबटलो होतो. यामध्ये प्रामुख्याने म्हणायच तर मित्रांसोबत मद्यपानाच्या  पार्ट्या करणे, गुटखा खाणे, तंबाखू सेवन करणे, चोरुन-चोरुन आजोबांनी आणुन ठेवलेल्या बिडी ओढणे. पार्टी करताना सिगारेट ओढणे असे विविध प्रकारचे व्यसन मी अगदी लपून छपून का होईनापण करत होतो.

अचानकच एके दिवशी काॕलेजमधील सिनीयर मित्र रामचंद्र वाघमारे व जावेद नगारे सोबत बोलताना आपापल्या कामाबद्दल माहिती, ओळख करुन घेत असताना समजलं कि, हे दोघेही “सारथी युथ फौंडेशन” मार्फत  व्यसनमुक्तीसाठी गेल्या काही वर्षापासून अविरतपणे कार्य करत आहेत. आजतागायत ते पूर्ण राज्यभरात फिरुन व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेऊन हजारो लोकांना मार्गदर्शन केलेले आहेत ते आजतागायतही अविरतपणे करताहेत तेही अगदी निरपेक्ष वृत्तीने. व्यसनमुक्ती सोबत एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग, टिबी आदी विषयांवरही प्रत्यक्षात कार्यशाळा घेऊन आणि मोबाईल फोनवर देखील  मार्गदर्शन करताहेत, हे खूपच महत्वपूर्ण आहे आस मला वाटले.

एके दिवशी  रामचंद्र वाघमारे यांचा वेळ घेऊन त्यांच्या संस्थेच्या आॕफिसला भेट दिली. व्यसनाबद्दल माहिती घेण्यासाठी गेलो असता, व्यसन म्हणजे नेमकं काय? व्यसन कोण व का करतात? व्यसनाचे प्रकार? व्यसनाचे परिणाम आणि यामुळे होणारे भयंकर आजार, दुष्परिणाम  तसेच हे करत असताना आर्थिक नुकसान किती होत. आदीं विषयावर रामचंद्र नी  अगदी सविस्तरपणे माहीती दिली. तेंव्हापासून मनोमन इच्छा होत होती कि, आपणही व्यसन सोडाव, व्यसनमुक्त व्हावं पण काही केल्या ते सुटत नव्हत.

एक दिवस योगायोग असा आला कि जागतिक 31 मे तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त सारथी संस्थेच्या वतीने सोलापूरमधील पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी हिंदवी परीवार यांच्यावतीने देखील सोलापूरच्या भुईकोट किल्यामध्ये गडकिल्ले मोहिमेबद्दल एका कार्यक्रमाचे, बैठकीच आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मी तेथे गेलो होतो. कार्यक्रम संपवून मी सहजच मित्रांसोबत गप्पागोष्टी करत थांबलो होतो. तेंव्हा योगायोगाने सारथी संस्थेचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक तेथे व्यसनमुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाच्या तयारीत गुंतलेले दिसले, मी तेथे माझे मार्गदर्शक व बंधुसमान मित्र, आदर्श व्यक्तीमत्व आदरणीय गुरुशांत (दादा)धुत्तरगांवकर मिळुन  जाऊन त्यांची भेट घेऊन मी ही या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात सहभागी झालो, चार हुतात्म्यांच्या साक्षीने व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा मी घेतली. मग तेंव्हापासून मी दृढनिश्चय केला कि, आपण यापुढे कोणतेही, कसल्याही प्रकारचे व्यसन करायच नाही. तेंव्हापासून ते आजतागायत म्हणजे तब्बल 4-5वर्षे झाले मी अगदी निर्व्यसनी जीवन जगतोय आणी माझ्यापासून प्रेरणा घेऊन माझे काही मित्रही निर्व्यसनी झालेत, होत आहेत.

व्यसन हे सहजासहजी किंवा कोणाच्या सांगण्यामुळे सुटणे अवघड असते. का तर याला गरज असते तेवढयाच “तीव्र मानसिक इच्छाशक्तीची”. म्हणतात ना मित्रांनो आपण मनात आणलं तर जग ही जिंकु शकतो. मग व्यसन सोडणे ही तर काय चीज. आजचा युवक हा व्यसनाधीनतेमुळे वेगवेगळ्या प्रकारे भटकताना आढळतोय. मित्रांनो हे कुठेतरी थांबणे, थांबवणे खूप गरजेच आहे. भारताचे माजी राष्ट्रपती थोर व्यक्तीमत्व ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांनी भारताला  सन 2020 पर्यंत जागतिक महासत्ताक देश बनवण्याचा स्वन पाहिला होत. ते तर आज या जगात नाहीत परंतु आपणाला त्यांच स्वन पूर्ण करायच असेल तर या देशातील प्रत्येक व्यक्ती, युवक निर्व्यसनी होणे गरजेच आहे. कारण त्यांनी आपल्या सारख्या युवकांना समोर ठेऊनच हे स्वप्न बघितलेलं होतं. म्हणुन युवक हा व्यसनमुक्त असणे खूप महत्त्वाच आहे.

व्यसन हा देखील एक प्रकारच आजारच आहे असं म्हणावं लागेल. कारण हा एकदा जडला कि लवकरात-लवकर जाणे, सुटणे किंवा यापासून परावृत्त व्हायला खूप वेळ लागतो, त्रास होतो. व्यसन सोडवण्यासाठी आज अनेक व्यसनमुक्ती संस्था कार्यरत आहेत. हे आपण योग्यवेळी समजावून घेऊन त्यांच्याकडे जाऊन किंवा अप्रत्यक्षपणे, निसंकोचपणे माहिती घेऊन व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. किंवा व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राला भेट देणे शक्य नसल्यास आपल्या वरिष्ठ, अनुभवी, विश्वासु, माहितगार व्यक्तींना भेटुन देखील योग्य मार्गदर्शन घेऊन व्यसन सोडता, सोडवता येऊ शकते. व्यसन सोडण्यासाठी शेवटी एवढंच म्हणावं वाटते कि “मनाचा ब्रेक, हाच उत्तम ब्रेक”! मानसीक इच्छेशिवाय या जगात काहीही अशक्यच आहे. सारथीकडे जाऊया व्यसनमुक्त होऊया.

  • तुकाराम चाबूकस्वार (सामाजिक कार्यकर्ता व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह,नाकोडा हॉलिडे प्रा. लि. सोलापूर)
Posted in Uncategorized.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *