सारथी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची सुरुवात कशी झाली हे पण आपल्याला माहिती आहे. संकटातून वाट काढून तिने आपले नाव केले. या नावातच याचा अर्थ दिसून येतो. सारथी आपल्यासाठी नवीन नाही सोलापूर आणि महाराष्ट्र मध्ये तिचं नाव आपल्याला दिसून येते .
सारथीचे काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज मला सारथी सोबतचे माझ वैयक्तिक नाते कसे निर्माण होत गेले हेच सांगायचे आहे. समाजकार्याची शिक्षण घेताना माझी सारथीची ओळख झाली. झोपडपट्टीमध्ये फिरणे तिथल्या लोकांशी बोलणे खूप क्षेत्रीय कार्या दरम्यान अवघड वाटू लागले. एचआयव्ही/एड्स बद्दल बोलणे असू की व्यसनावर बोलणे त्यात सगळ्यात पहिला प्रसंग आला तो संजय गांधी झोपडपट्टीमध्ये जाण्याचा त्याच्यानंतर महाराणाप्रताप झोपडपट्टी आणि कुष्ठरोग वसाहत अशा ठिकाणी जायला भीती वाटायची. रामचंद्र वाघमारे सरांनी ही भीती दूर केली शैला मॅडम ची साथ लाभली आणि आम्ही विद्यार्थी म्हणून शिकत शिकत समाजामध्ये माणूस म्हणून जगू लागलो. माणसांना माणूस म्हणून पाहू लागलो. समाजात आल्यावर समाजामध्ये राहायला हे सारथीने शिकवले.
पुढे जाऊन मी सारथीच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवू लागले, यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. आत्मविश्वासाबरोबरच मला एक चांगले समुपदेशक भेटले त्या समुपदेशकाने पावलो पावली माझी मदत केली. मला जगण्याचा अर्थ समजून सांगितला आणि चांगली स्वप्निका निर्माण केली. माझा दुसरा जन्म सारथीने केला. माझ्या मनातली भीती शंका सर्व दूर केल्या आणि आयुष्यभर माझी एक चांगली साथ मला मिळाली आज सारथीचे दहा वर्षे पूर्ण होत आहे त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा!!
- स्वप्नीका बायस (समन्वयक, एनआयई दैनिक सकाळ सोलापूर)