सारथी ही माझ्या करिअरसाठी यशाची पायरी…

मला सारथी विषयी लिहिताना खूप आनंद होत आहे. कारण कि मी या संस्थेशी २०१३ सालापासून जोडलेली आहे. ही संस्था मला माझ्या शैक्षणिक क्षेत्रात एक विशेष भाग म्हणून लाभली होती. खर म्हणजे माझी ह्या संस्थेमध्ये एमएसड्ब्लु ह्या कोर्सचा अभ्यास करत असताना क्षेत्रीयकार्य करण्यासाठी पाठवणी झाली होती. त्यावेळी सुरूवातीला माझी ओळख जावेद नगारे सर, सुदर्शना भंडारी मॅडम यांच्याशी झाली. त्यांनी मला संस्थेची पूर्ण माहिती दिली. एकेदिवशी त्यांनी माझी ओळख सारथीचे आणखी एक सदस्य म्हणून रामचंद्र वाघमारे सरांशी करून दिली. त्यावेळी रामचंद्र सर हे एचआयव्ही या विषयावर काम करत आहेत हे समजले. त्यांच्याकडून या विषयाबाबत सखोल अशी माहिती मिळाली याच विषयावर आपण काम करण्याबाबत प्रोत्साहन यावेळी मिळाले.  वेळेचे व्यवस्थापन, गटचर्चा, समुपदेशन, व्यक्तिसहयोगकार्य, सत्र कशी घ्यावीत आणि समुदायात कार्य कसे करावे याबाबत सविस्तर भेटी आणि प्रत्येक्षं कृती याबाबत सविस्तर ज्ञान मिळाले.

स्वतः मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समुदायातील महिलाना एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग हयाविषयी मी जनजागृती करू लागले. पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शने घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली. यातून मी खूप काही शिकत गेले.

माझ्या करियरमध्ये देखील सारथीचे खुप योगदान आहे. सारथीमुळेच मला एचआयव्ही/एड्स क्षेत्रात काम करणार्‍या हेल्पलाईनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी खूप ठिकाणी काम केले. आता मी कोणत्याही ठिकाणी आत्मविश्वासाने काम करू शकते. विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ता ते व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता या प्रवासात महाविद्यालयातील प्राध्यापकासह सारथीचे खूप मोठे योगदान आहे. सारथी ही माझ्या करिअरसाठी यशाची पायरी ठरली आहे. व्यक्तीगत जीवनातही सारथीचे अनमोल सहकार्य मिळाले आहे. सध्या सारथी खूप छान काम करीत आहे. असेच कार्य सारथी तर्फे घडत राहो आणि आमच्यासारखे व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते घडत राहो. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!!

  • अंबिका साखरमोळ ( स्वयंसेवक – सारथी युथ फौंडेशन, सोलापूर )
Posted in Uncategorized.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *