Sarathi Youth Foundation https://sarathiyouthfoundation.org.in We believe in YOUTH Power Thu, 04 Jun 2020 14:24:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.4.1 https://sarathiyouthfoundation.org.in/wp-content/uploads/2019/04/cropped-Sarathi-Logo-1-32x32.png Sarathi Youth Foundation https://sarathiyouthfoundation.org.in 32 32 सारथी ही माझ्या करिअरसाठी यशाची पायरी… https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/ https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/#respond Thu, 04 Jun 2020 14:23:56 +0000 https://sarathiyouthfoundation.org.in/?p=1281 मला सारथी विषयी लिहिताना खूप आनंद होत आहे. कारण कि मी या संस्थेशी २०१३ सालापासून जोडलेली आहे. ही संस्था मला माझ्या शैक्षणिक क्षेत्रात एक विशेष भाग म्हणून लाभली होती. खर म्हणजे माझी ह्या संस्थेमध्ये एमएसड्ब्लु ह्या कोर्सचा अभ्यास करत असताना क्षेत्रीयकार्य करण्यासाठी पाठवणी झाली होती. त्यावेळी सुरूवातीला माझी ओळख जावेद नगारे सर, सुदर्शना भंडारी मॅडम यांच्याशी झाली. त्यांनी मला संस्थेची पूर्ण माहिती दिली. एकेदिवशी त्यांनी माझी ओळख सारथीचे आणखी एक सदस्य म्हणून रामचंद्र वाघमारे सरांशी करून दिली. त्यावेळी रामचंद्र सर हे एचआयव्ही या विषयावर काम करत आहेत हे समजले. त्यांच्याकडून या विषयाबाबत सखोल अशी माहिती मिळाली याच विषयावर आपण काम करण्याबाबत प्रोत्साहन यावेळी मिळाले.  वेळेचे व्यवस्थापन, गटचर्चा, समुपदेशन, व्यक्तिसहयोगकार्य, सत्र कशी घ्यावीत आणि समुदायात कार्य कसे करावे याबाबत सविस्तर भेटी आणि प्रत्येक्षं कृती याबाबत सविस्तर ज्ञान मिळाले.

स्वतः मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समुदायातील महिलाना एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग हयाविषयी मी जनजागृती करू लागले. पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शने घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली. यातून मी खूप काही शिकत गेले.

माझ्या करियरमध्ये देखील सारथीचे खुप योगदान आहे. सारथीमुळेच मला एचआयव्ही/एड्स क्षेत्रात काम करणार्‍या हेल्पलाईनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी खूप ठिकाणी काम केले. आता मी कोणत्याही ठिकाणी आत्मविश्वासाने काम करू शकते. विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ता ते व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता या प्रवासात महाविद्यालयातील प्राध्यापकासह सारथीचे खूप मोठे योगदान आहे. सारथी ही माझ्या करिअरसाठी यशाची पायरी ठरली आहे. व्यक्तीगत जीवनातही सारथीचे अनमोल सहकार्य मिळाले आहे. सध्या सारथी खूप छान काम करीत आहे. असेच कार्य सारथी तर्फे घडत राहो आणि आमच्यासारखे व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते घडत राहो. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!!

  • अंबिका साखरमोळ ( स्वयंसेवक – सारथी युथ फौंडेशन, सोलापूर )
]]>
https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/feed/ 0
जगण्याचा अर्थ समजवणारी सारथी…. https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8/ https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8/#respond Thu, 04 Jun 2020 14:21:30 +0000 https://sarathiyouthfoundation.org.in/?p=1278 सारथी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची सुरुवात कशी झाली हे पण आपल्याला माहिती आहे.  संकटातून वाट काढून तिने आपले नाव केले. या नावातच याचा अर्थ  दिसून येतो. सारथी आपल्यासाठी नवीन नाही सोलापूर आणि महाराष्ट्र मध्ये तिचं नाव आपल्याला दिसून येते .

सारथीचे काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज मला सारथी सोबतचे माझ वैयक्तिक नाते कसे निर्माण होत गेले हेच सांगायचे आहे. समाजकार्याची शिक्षण घेताना माझी सारथीची ओळख झाली. झोपडपट्टीमध्ये फिरणे तिथल्या लोकांशी बोलणे खूप क्षेत्रीय कार्या दरम्यान अवघड वाटू लागले. एचआयव्ही/एड्स बद्दल बोलणे असू की व्यसनावर बोलणे त्यात सगळ्यात पहिला प्रसंग आला तो संजय गांधी झोपडपट्टीमध्ये जाण्याचा त्याच्यानंतर महाराणाप्रताप झोपडपट्टी आणि कुष्ठरोग वसाहत अशा ठिकाणी जायला भीती वाटायची. रामचंद्र वाघमारे सरांनी ही भीती दूर केली शैला मॅडम ची साथ लाभली आणि आम्ही विद्यार्थी म्हणून शिकत शिकत समाजामध्ये माणूस म्हणून जगू लागलो. माणसांना माणूस म्हणून पाहू लागलो. समाजात आल्यावर समाजामध्ये राहायला हे सारथीने शिकवले.

पुढे जाऊन मी सारथीच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवू लागले, यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. आत्मविश्वासाबरोबरच मला एक चांगले समुपदेशक भेटले त्या समुपदेशकाने पावलो पावली माझी मदत केली. मला जगण्याचा अर्थ समजून सांगितला आणि चांगली स्वप्निका निर्माण केली. माझा दुसरा जन्म सारथीने केला. माझ्या  मनातली भीती शंका सर्व दूर केल्या आणि आयुष्यभर माझी एक चांगली साथ मला मिळाली आज सारथीचे दहा वर्षे पूर्ण होत आहे त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा!!

  • स्वप्नीका बायस (समन्वयक, एनआयई दैनिक सकाळ सोलापूर)
]]>
https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8/feed/ 0
आणि मी व्यसनमुक्त झालो… https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8b/ https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8b/#respond Thu, 04 Jun 2020 14:15:02 +0000 https://sarathiyouthfoundation.org.in/?p=1275 भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्यसन हे असतेच. मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना. व्यसनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने धुम्रपान करणे, मद्यपान करणे, इंजेक्शनच्या हे आणि ह्या स्वरुपातील व्यसन. काही वाईट व्यसन असतात, तर काहींना चांगले देखील व्यसन असतात. यामध्ये प्रामुख्याने म्हणायच तर व्यायाम करुन उत्तम शरीरयष्टी कमविण्याच व्यसन, सातत्याने वाचन, लिखाण करण्याच व्यसन असे विविध प्रकारचे चांगले सवय देखील असते. व्यसन करण्याच प्रमाण पुरुषामध्येच सर्वात जास्त असले तरी याला अपवाद महिलांचेही प्रमाण हल्लीच्या काळात वाढताना आढळतेय.

मी पण कधीकाळी व्यसनाधीनतेने बरबटलो होतो. यामध्ये प्रामुख्याने म्हणायच तर मित्रांसोबत मद्यपानाच्या  पार्ट्या करणे, गुटखा खाणे, तंबाखू सेवन करणे, चोरुन-चोरुन आजोबांनी आणुन ठेवलेल्या बिडी ओढणे. पार्टी करताना सिगारेट ओढणे असे विविध प्रकारचे व्यसन मी अगदी लपून छपून का होईनापण करत होतो.

अचानकच एके दिवशी काॕलेजमधील सिनीयर मित्र रामचंद्र वाघमारे व जावेद नगारे सोबत बोलताना आपापल्या कामाबद्दल माहिती, ओळख करुन घेत असताना समजलं कि, हे दोघेही “सारथी युथ फौंडेशन” मार्फत  व्यसनमुक्तीसाठी गेल्या काही वर्षापासून अविरतपणे कार्य करत आहेत. आजतागायत ते पूर्ण राज्यभरात फिरुन व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेऊन हजारो लोकांना मार्गदर्शन केलेले आहेत ते आजतागायतही अविरतपणे करताहेत तेही अगदी निरपेक्ष वृत्तीने. व्यसनमुक्ती सोबत एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग, टिबी आदी विषयांवरही प्रत्यक्षात कार्यशाळा घेऊन आणि मोबाईल फोनवर देखील  मार्गदर्शन करताहेत, हे खूपच महत्वपूर्ण आहे आस मला वाटले.

एके दिवशी  रामचंद्र वाघमारे यांचा वेळ घेऊन त्यांच्या संस्थेच्या आॕफिसला भेट दिली. व्यसनाबद्दल माहिती घेण्यासाठी गेलो असता, व्यसन म्हणजे नेमकं काय? व्यसन कोण व का करतात? व्यसनाचे प्रकार? व्यसनाचे परिणाम आणि यामुळे होणारे भयंकर आजार, दुष्परिणाम  तसेच हे करत असताना आर्थिक नुकसान किती होत. आदीं विषयावर रामचंद्र नी  अगदी सविस्तरपणे माहीती दिली. तेंव्हापासून मनोमन इच्छा होत होती कि, आपणही व्यसन सोडाव, व्यसनमुक्त व्हावं पण काही केल्या ते सुटत नव्हत.

एक दिवस योगायोग असा आला कि जागतिक 31 मे तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त सारथी संस्थेच्या वतीने सोलापूरमधील पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी हिंदवी परीवार यांच्यावतीने देखील सोलापूरच्या भुईकोट किल्यामध्ये गडकिल्ले मोहिमेबद्दल एका कार्यक्रमाचे, बैठकीच आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मी तेथे गेलो होतो. कार्यक्रम संपवून मी सहजच मित्रांसोबत गप्पागोष्टी करत थांबलो होतो. तेंव्हा योगायोगाने सारथी संस्थेचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक तेथे व्यसनमुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाच्या तयारीत गुंतलेले दिसले, मी तेथे माझे मार्गदर्शक व बंधुसमान मित्र, आदर्श व्यक्तीमत्व आदरणीय गुरुशांत (दादा)धुत्तरगांवकर मिळुन  जाऊन त्यांची भेट घेऊन मी ही या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात सहभागी झालो, चार हुतात्म्यांच्या साक्षीने व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा मी घेतली. मग तेंव्हापासून मी दृढनिश्चय केला कि, आपण यापुढे कोणतेही, कसल्याही प्रकारचे व्यसन करायच नाही. तेंव्हापासून ते आजतागायत म्हणजे तब्बल 4-5वर्षे झाले मी अगदी निर्व्यसनी जीवन जगतोय आणी माझ्यापासून प्रेरणा घेऊन माझे काही मित्रही निर्व्यसनी झालेत, होत आहेत.

व्यसन हे सहजासहजी किंवा कोणाच्या सांगण्यामुळे सुटणे अवघड असते. का तर याला गरज असते तेवढयाच “तीव्र मानसिक इच्छाशक्तीची”. म्हणतात ना मित्रांनो आपण मनात आणलं तर जग ही जिंकु शकतो. मग व्यसन सोडणे ही तर काय चीज. आजचा युवक हा व्यसनाधीनतेमुळे वेगवेगळ्या प्रकारे भटकताना आढळतोय. मित्रांनो हे कुठेतरी थांबणे, थांबवणे खूप गरजेच आहे. भारताचे माजी राष्ट्रपती थोर व्यक्तीमत्व ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांनी भारताला  सन 2020 पर्यंत जागतिक महासत्ताक देश बनवण्याचा स्वन पाहिला होत. ते तर आज या जगात नाहीत परंतु आपणाला त्यांच स्वन पूर्ण करायच असेल तर या देशातील प्रत्येक व्यक्ती, युवक निर्व्यसनी होणे गरजेच आहे. कारण त्यांनी आपल्या सारख्या युवकांना समोर ठेऊनच हे स्वप्न बघितलेलं होतं. म्हणुन युवक हा व्यसनमुक्त असणे खूप महत्त्वाच आहे.

व्यसन हा देखील एक प्रकारच आजारच आहे असं म्हणावं लागेल. कारण हा एकदा जडला कि लवकरात-लवकर जाणे, सुटणे किंवा यापासून परावृत्त व्हायला खूप वेळ लागतो, त्रास होतो. व्यसन सोडवण्यासाठी आज अनेक व्यसनमुक्ती संस्था कार्यरत आहेत. हे आपण योग्यवेळी समजावून घेऊन त्यांच्याकडे जाऊन किंवा अप्रत्यक्षपणे, निसंकोचपणे माहिती घेऊन व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. किंवा व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राला भेट देणे शक्य नसल्यास आपल्या वरिष्ठ, अनुभवी, विश्वासु, माहितगार व्यक्तींना भेटुन देखील योग्य मार्गदर्शन घेऊन व्यसन सोडता, सोडवता येऊ शकते. व्यसन सोडण्यासाठी शेवटी एवढंच म्हणावं वाटते कि “मनाचा ब्रेक, हाच उत्तम ब्रेक”! मानसीक इच्छेशिवाय या जगात काहीही अशक्यच आहे. सारथीकडे जाऊया व्यसनमुक्त होऊया.

  • तुकाराम चाबूकस्वार (सामाजिक कार्यकर्ता व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह,नाकोडा हॉलिडे प्रा. लि. सोलापूर)
]]>
https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8b/feed/ 0
अनुभवपूर्ण सारथी फेलोशिप…. https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%aa/ https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%aa/#respond Thu, 04 Jun 2020 13:46:44 +0000 https://sarathiyouthfoundation.org.in/?p=1273 समाजकार्याची आवड तर होती पण नेमक काय कराव? या संभ्रमात मी होते. माझ शिक्षण तर यातच सुरू आहे मग मी अस काय करू ज्याच्यातून मी समाजासाठी काही तरी करू शकेन? यातच मे महिन्यात माझ्या मित्राचा शोएब शेख यांचा मला फोन आला. त्यांनी मला सारथी यूथ फौंडेशन सोलापूर मधील फेलोशिपबद्दल सांगितले. फेलोशिपच ऐकून कुठे तरी माझ्या प्रश्नाच उत्तर मला मिळाल होत. म्हणून मी फेलोशिपसाठी अर्ज करायच ठरवल. सारथीचे सचिव श्री रामचंद्र वाघमारे सर यांच्याशी बोलले. त्यांनी मला मुलाखतीची दिनांक आणि वेळ सांगितली. मला फेलोशिपच समजल त्यावेळेस कॉलेजला सुट्ट्या चालू असल्यामुळे मी गावी होते. मूलाखतीला जाताना मनात खूप विचार येत होते. मुलाखत कशी होणार? काय प्रश्न विचारतील? माझी निवड तर होईल ना? हे सगळे प्रश्न घेऊन मी मुलाखतीसाठी सारथीच्या कार्यालयात पोहोचले. मुलाखत हे सारथीचे सचीव श्री रामचंद्र वाघमारे सर घेणार होते. त्यांनी मुलाखतीला सुरुवात केली आणि माझ्या काळजाचे ठोके वाढले. मुलाखत तर चांगली गेली पण निबड होईल की नाही? हा मोठा प्रश्न होता. त्यांनी निवडीबद्दल लवकर कळवतो असे सांगितले होते. त्यामुळे मनात उत्सुकता लागली होती. जून महिन्याच्या शेवटी सरांशी बोलण झाल त्यावेळेस त्यांनी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर साठी फेलोची निवड करायची आहे असे सांगितले. तुम्ही या तालुक्यांसाठी तयार आहात का? असा प्रश्न विचारल्यानंतर मी होकार दिला.
त्याच दिवशी सरांनी आम्हाला कार्यक्रम कसे घ्यायचे? आपल मत कस पटवून द्यायच? याच ट्रेनिंग दिल. त्याचप्रमाणे तंबाखू व्यसनमुक्तीचे कार्यक्रम कोठे कोठे घ्यायचे आहेत? त्याच नियोजन कशापद्धतीच आहे? याची पूर्ण माहिती दिली. सरांनी ट्रेनिंग दिल त्याचबरोबर कार्यक्रमासाठी लागणारे साहित्यही दिले. पण शाळेमध्ये जाऊन सादरीकरण करण्याअगोदर ते सरांसमोर सादरीकरण करून दाखवायचे होते. ज्यामुळे इतरांपर्यंत चुकीची माहिती जाऊ नये. तसेच आम्ही कशापद्धतीने सादरीकरण करतो आणि त्यात कोणकोणत्या उणीवा आहेत हे जाणून घेणे गरजेचे होते. अभ्यास करून सरांसमोर सादरीकरण केले त्यावेळेस सरांच सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव आला. माझ्या सदरीकरनात अशा खूप साऱ्या गोष्टी दिसून आल्या ज्यात मला बदल करणे गरजेचे होते.
सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी बदल करत गेले. त्या गोष्टीचा फायदा मला कार्यक्रम घेताना झाला कारण कार्यक्रम शाळा-महाविद्यालय आणि समुदाय स्तरावर घ्यायचे होते. वयोगट सुद्धा वेगवेगळा होता. मग त्यांना एकाच पट्टीमध्ये सांगणे योग्य नव्हते. वयोगटानुसार आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यासाठी आपल्यामध्ये आवाजाचा चढउतार, बोलण्याची पद्धत, समोरच्याला समजून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. हीच गुणकौशल्ये समाजकार्यात खूप महत्त्वाची असतात असे सर नेहमी म्हणत. याचा पुरेपूर अनुभव मी घेतला आहे. कारण ज्या वेळेस मी शाळेत कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी जात होते तेव्हा मला कधीकधी परवानगीही खूप सहजासहजी मिळत असे पण काही वेळेस परवानगी घेण्यासाठी त्यांना या कार्यक्रमाची गरज का आहे? हे पटवून द्यावे लागत असे. त्यामुळे विद्यार्थी असो किंवा शिक्षक त्यांना आपलं मत कितपत पटवून देऊ शकतो हे महत्त्वाचे असते.
शाळेमध्ये कार्यक्रम घेत असताना काही वेळेस मला असे अनुभव आले ज्यामुळे मी खचून जात असे. रागही खूप येत होता. कारण मला वाटायचे तंबाखू व्यसन हा इतका गंभीर प्रश्‍न असूनदेखील याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. काही शाळांमध्ये तर शिक्षकांकडून नकारात्मक दृष्टिकोन दिसून येत त्यामुळे निराशा निर्माण होई. पण त्यावेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे हे वाघमारे सर समजावून सांगत. येणारा प्रत्येक अनुभव हा सारखाच असेल असे नाही तर आपण येणाऱ्या प्रत्येक अनुभवासाठी तयार असले पाहिजे हे महत्त्वाचे.
ज्या पद्धतीने शाळेमध्ये कार्यक्रम घेतले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देखील घेतले. महाविद्यालयीन स्तरावर कार्यक्रम घेताना मनामध्ये खूप भीती वाटत असे. विद्यार्थी आपल्याला प्रतिसाद देतील का? शिक्षकांचा दृष्टिकोन कसा असेल? मी कार्यक्रम घेऊ शकेन की नाही? पण खरोखरच महाविद्यालयीन कार्यक्रमाचे अनुभव हे खूप वेगळे होते. मला ज्या गोष्टीची भीती वाटत ते होतच नसे. तिथले शिक्षक खूप सहकार्य करत, विद्यार्थी सहकार्य करत. एवढेच नव्हे तर विद्यार्थी आपण व्यसनी आहोत हे मान्य देखील करत. विद्यार्थ्याँना जाणिव होती की आपण चुकीचं करतोय. आणि शिक्षक यांना योग्य वाटेवर आणण्यासाठी प्रयत्न करत असे. काही ठिकाणी शिक्षकांनी स्वतः मान्य केले की आमचे व्यसन सुटत नाही आम्ही काय करू देत. विद्यार्थ्यांना आम्ही कसं सांगू जेव्हा आम्हीच व्यसनी आहोत. आमच देखील तुम्ही समुपदेशन करा आम्हालाही व्यसन सोडायचे आहे.
म्हणजे शाळा आणि महाविद्यालय स्तरावर जसे चांगले अनुभव आले तसेच वाईट अनुभव आले. पण प्रत्येक अनुभव मला खूप काही शिकवून गेला. माझ्या गुणांमध्ये बदल करत गेला. कार्यक्रम घेताना असं नाही की फक्त शिक्षकांची ओळख झाली सोबतच अधिकाऱ्यांची देखील ओळख झाली कारण सलाम मुंबई फाऊंडेशन आणि सारथी यूथ फाउंडेशन मिळून सोलापूर जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यासाठी एकत्रितपणे काम करत होते. त्यामुळे मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी वाढत होत्या. कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांना ११ निकषाबद्दल माहिती देत होतो, त्यांचे निकष पूर्ण आहेत की नाहीत याची पूर्तता करून घेत होतो.
पण ज्यावेळेस समुदायस्तरावर तंबाखू व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेतला तेव्हा मात्र मला अनपेक्षित असे सहकार्य मिळे. कारण जेव्हा मी गणपती मंडळ आणि नवरात्र मंडळ मध्ये हे कार्यक्रम घेतले तेव्हा पालकांना पोस्टरच्या माध्यमातून तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम, त्याचा आपल्या कुटुंबावरती, आपल्यावरती कसा परिणाम होतो, आजार कसे होतात अशी वेगळी माहिती दिल्यानंतर त्यांच्यामध्ये तंबाखू सोडण्याची इच्छा दिसून आली. एवढेच नाही तर त्यावेळेस वेगवेगळ्या समुदायात कार्यक्रमासाठी परवानगी घेत तेव्हा ते उत्स्फूर्तपणे परवानगी देत आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत. आजची युवा पिढी तंबाखू व्यसनाबद्दल किती जागरूक आहे याची सुद्धा जाणीव होत. एवढेच नाही तर ते लोक दुसऱ्या लोकांना कार्यक्रम आयोजनाबद्दल सांगत.
प्रत्येक स्तरांमध्ये, वयोगटामध्ये कार्यक्रम घेताना इच्छाशक्ती अधिकाधिक प्रबल होत जात. मनामध्ये खात्री असे की आपण अधिक चांगलं करू शकतो. खरंच या फेलोशिपच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा गुणांची खूप भर पडली आहे. हे गुण फक्‍त फेलोशिपसाठी नव्हे तर भविष्यकाळात नोकरी करताना खूप महत्त्वाची ठरतील. वाघमारे सर नेहमी म्हणत समाजाकार्यामध्ये काम करताना संयम, धीर, रागावरती नियंत्रण, परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ही सर्व कौशल्ये अंगी बाळगली पाहिजे तेव्हाच आपण समाजकार्य करू शकू.
खरंच आज मी खूप खुष आहे की सारथी यूथ फौंडेशन सोबत जोडले गेले. सारथीने मला आजपर्यंत खूप काही दिले. माझ्या ज्ञानात भर पडली. माझ्या वेगवेगळ्या शंकांचे निरसन केले. जेव्हा मी खचून जात तेव्हा मला पुन्हा उभा करण्याचं आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम सारथीन केल. आज मी सारथीची शतशः ऋणी आहे. आणि ऋणी आहे ते म्हणजे शोएब शेख यांची त्यांनी मला रस्ता दाखवला नसता तर आज मला एवढं सगळं बोलता आलं असतं.
सारथीच्या याच आपलेपणाच्या भावनेमुळे आयुष्यभर सारथीसोबत राहून कार्यरत राहण्याची इच्छा आहे.

– आस्मा पटेल (फेलो – तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्प, उत्तर सोलापूर)

]]>
https://sarathiyouthfoundation.org.in/2020/06/04/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%aa/feed/ 0
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त….. https://sarathiyouthfoundation.org.in/2019/10/02/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7/ https://sarathiyouthfoundation.org.in/2019/10/02/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7/#comments Wed, 02 Oct 2019 07:34:14 +0000 https://sarathiyouthfoundation.org.in/?p=527 नमस्कार,

सर्वप्रथम गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना व्यसनमुक्त भारताचे पुरस्कर्ते म्हणून आपण ओळखतो. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त सारथी युथ फौंडेशन, सोलापूर अंतर्गत चालविल्या जात असलेल्या व्यसनमुक्ती प्रकल्पामधील एक सत्य अनुभव कथा आपणासमोर मांडत आहे.

स्वत: साठी तंबाखू व्यसनमुक्त होताना…

लोधी गल्ली सोलापूर शहरातील असे ठिकाण जिथ मोठ्याप्रमाणात विडी बनविणार्‍या कामगारांची घरे आहेत. विडी कामगार कुटुंबातील अनेक महिला व मुली सदर काम करताना दिसतात. त्यांच्यासाठी ते रोजगाराचे साधन आहे. काही दिवसांपूर्वी विडी कामावर बंदी आणण्यात आली होती तेव्हा अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. कुटुंबाची गुजराण कशी करावी या प्रश्नावरती पर्याय दिसेना तेव्हा सोलापुरातील काही विडी कामगारानी आत्महत्या करणे हा पर्याय निवडला. काही आत्महत्या झाल्या तर काहींनी आत्महत्येचे प्रयत्न केले. एकीकडे रोजगारचा प्रश्न तर दुसरीकडे तंबाखू व्यसनाचे वाढते प्रमाण अशा दोन टोकाच्या बाजू. घरातील महिला विडी बनवतात तर बहुतांश पुरुष वर्ग विविध प्रकारांच्या व्यसनात गुंग असतात. अशावेळी व्यसनमुक्ती कार्यक्रमाची गरज निर्माण झाली. सारथी युथ फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, केंद्र लोधी गल्ली येथे तंबाखू व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमास एक-एक व्यक्तीस बोलावून घ्यावे लागले. महिला विडी बनविण्यात व्यस्त असल्याने त्या कमी-अधिक प्रमाणात सहभागी झाल्या. बुधवार हा त्यांचा सुट्टीचा दिवस. काही तरुणांना कट्ट्यावर बसण्याएवजी कार्यक्रमात येऊन बसा अशी विनंती केल्यानंतर एक-एक युवक कार्यक्रम ठिकाणी येऊन बसू लागले. कार्यक्रमात उपस्थित युवकांना तंबाखू व्यसन काय असते, व्यसन लागण्याची कारणे, त्याचे दुष्परिणाम, व्यसमुक्तीसाठी उपाययोजना याविषयावर त्यांना समजेल अशा शब्दांमध्ये मार्गदर्शन करण्यात्त आले. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना विचारले, “आपणापैकी कितीजण तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करता?” त्यावेळी उपस्थित 40 हून जास्त व्यक्तिपैकी 50% व्यक्तींनी हात वर केले. यावरून हा विषय त्यांच्यापर्यंत पोहचणे किती गरजेच होत हे समजले. हात वर केलेल्यापैकी काही व्यक्तींना तंबाखू सोडायची आहे तर काहींना याबाबतीत काहीच मत व्यक्त कारायचे नाही हे समजले. ज्यांना सोडण्याची इच्छा आहे त्यांना तंबाखू सोडण्यासाठी कसे पर्याय निवडता येतील हे सांगण्यात आले. सोबतच गरजेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय दवाखान्यात पाठविण्यात आले. समुपदेशनासाठी सारथीचा संदर्भही देण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतरही काही युवक प्रश्न विचारून माहिती पुन्हा जाणून घेत होते. एक युवक कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सर्वांच्या पुढे बसून सर्व माहिती गंभीरतेने समजून घेत होता. कार्यक्रम संपल्यानंतर येऊन भेटला. म्हणाला, “मला थोडी माहिती घ्यायची आहे परंतु मी तुम्हाला नंतर आपल्या कार्यालयात येऊन भेटतो.”

दोन दिवसानंतर सारथीच्या नंबर वरती फोन आला. “सर मी तुम्हाला कार्यक्रमात भेटलो होतो. मला तुम्हाला भेटायचे आहे.” दिलेल्या वेळेला तो सारथी कार्यालयात आला. समुपदेशना दरम्यान समजले की तो वयाच्या 14 व्या वर्षापासून तो गुटखा, मावा खातो आहे. गुटख्यावर बंदी आली म्हणून तो सध्या मावा खातो आहे. कार्यक्रमा दरम्यान दाखवण्यात आलेल्या चित्रामुळे तो थोडा घाबरला होता. सध्या त्याचे वय 26 आहे. तोंडामध्ये गरे येण, जेवणाची चव न समजणे, तोंड उघडण्यास अडचण होण असे त्रास त्याला अधून-मधून जाणवत होते. गुटखा, मावा सोडण्याचा त्याने खूप प्रयत्न केला होता परंतु ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करणारांची संख्या जास्त आहे. त्याने जरी सोडण्याचा प्रयत्न केला तरी कोणीतरी त्याला पुन्हा व्यसन करण्यास प्रवृत्त करतात.

कार्यक्रमात सांगितल्याप्रमाण तंबाखू व्यसन सोडण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. त्यानुसार ठाम निर्णय घेऊन त्याने मावा सोडण्याचा प्रयत्न देखील सुरू केला होता. कार्यक्रमानंतर आत्तापर्यंत स्वत: वर ताबा ठेऊन त्याने मावा खाल्ला नव्हता. यादरम्यान काहींनी त्यास पुन्हा मावा खाण्यास प्रवृत्त केले परंतु यावेळी त्याने साफ नकार दिला होता. त्याच्या या निर्णयाचे कौतुक करून त्यास पुढे प्रोत्साहित करण्यात आले. पुढेही असाच प्रयत्न करून तंबाखू जन्य पदार्थापासून दूर राहण्याचा विश्वासही त्याने दर्शविला.

दरम्यान एक इच्छा त्यांनी व्यक्त केली की, “मी आपणास स्वतंत्र का भेटण्यास आलो? कारण मला समाजातील लोकांसमोर या विषयावर बोलण्यास शरम वाटली. मला इतरांना कळू ही द्यायचे नाही की मी आपणाकडे व्यसन सोडविण्यसाठी आलो आहे. याआधी मी बर्‍याच वेळा व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न फसला तेव्हा समाजातील इतर लोक माझ्यावर हसले होते. आता मी स्वत: साठी व्यसन सोडण्याच प्रयत्न करतो आहे. कृपया ही माहिती कोणाला सांगू नका.” यावेळी त्याच्या नावाच्या गोपनीयतेबाबत विश्वास देण्यात आला.

खर्‍या अर्थाने कार्यक्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. एक व्यक्ति व्यसनापासून दूर गेला तर तो समाजातील इतर व्यक्तींचा आदर्श ठरतो. ज्यावेळे तो व्यसनास नकार देतो तेव्हा इतरांनाही तो कसा व्यसनापासून दूर जातो आहे हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. साहजिकच व्यसनमुक्त व्यक्ति समाजातील व्यसनमुक्ती चळवळीचा भाग बनून जातो. खरी गरज आहे ती युवकांनी समाजातील तंबाखू व्यसन दूर करण्यासाठी स्वत: व्यसनमुक्त राहण्याची आणि इतरांना व्यसनमुक्त करण्याची.

चला या चळवळीचा भाग बनूया, समाजातून तंबाखू व्यसन हद्दपार करूया.

-रामचंद्र वाघमारे 9096426241 (सारथी युथ फौंडेशन, सोलापूर)

]]>
https://sarathiyouthfoundation.org.in/2019/10/02/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 1
सारथीचे सारथ्य समजून घेताना माझ्यातील बदल https://sarathiyouthfoundation.org.in/2019/09/28/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4-2/ https://sarathiyouthfoundation.org.in/2019/09/28/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4-2/#respond Sat, 28 Sep 2019 13:40:41 +0000 https://sarathiyouthfoundation.org.in/?p=479 नमस्कार,वाचक हो मी या लेखात माझे काहीं अनुभव लेखन करीत आहे. महिना ऑक्टोबरचा होता. पुजा भालेराव या माझ्या कॉलेज मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली “सारथी युथ फाऊंडेशन सोलापूर या सामाजिक संस्थामध्ये, तंबाखू व्यसनमुक्ति या प्रकल्पा अंतर्गत इंटर्नशीपसाठीची जागा भरावयाची आहे. तुझी इच्छा आहे का इंटर्नशिप करण्याची ? अर्ज करण्याचा आजचा शेवट दिवस आहे.” खरंच मित्रांनो मी काही विचार न करता होकार दिला. कॉलेजला दोन दिवस सुट्टी असल्यामुळे गावाकडे गेलो होतो. मुलाखत त्याच दिवशी, थोडा विचार केला. मुलाखत द्यायला काय जातय असा विचार करून गावाकडून सोलापूरकडे निघालो.

माझ्यामध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होत. कारण मी ज्या गावामधून आलो होतो तो भाग म्हणजे कानडी भाषेचा प्रभाव असलेल गाव.माझ पुर्ण शिक्षण मराठी भाषेमध्ये झालेलं असलं तरी कानडी भाषेचा प्रभाव माझ्या बोलण्यात जाणवत होता. मराठी बोलणं दूरच वाटत होते. बोलण्यात अनेक चुका आणि अर्थाचा अनर्थ होत होता. आता तर मराठी मध्येच बोलावं लागणार होत. यामुळे बैचेनी वाढत होती. मुलाखतीला पोहोचलो. माझ्या समोर सारथीचे संस्थापक रामचंद्र वाघमारे होते. मी आतून घाबरलो होतो. वाघमारे सरांनी माझी सर्व प्राथमिक माहिती विचारली. मी अडखळत प्रश्नाचे उत्तर देत होतो. वाघमारे सरांनी विचारले, “तंबाखू व्यसनमुक्ति प्रकल्प न सोडता पुर्ण करणार का?”असे म्हंटल्यावर एक क्षणासाठी भीतीच वाटली.कारण कॉलेज असायनमेंट, सेमीस्टर पेपर, फील्ड वर्क,या सगळ्यामध्ये ही इंटर्नशीप पुर्ण होईल का? यासर्वांमध्ये इंटर्नशिप पूर्ण होणं शंकास्पद जास्त वाटत होत. त्याच वेळी अमिरखानच्या “थ्री इडियट” चित्रपटामधला डायलॉग मनात आला. “ऑल इज वेल” या प्रेरणादायी वाक्याची आठवण झाली. मी पण “ऑल इज वेल” म्हणुन होकरच दिला. वाघमारे सरांनी संस्थेची माहिती, इंटर्नशिपचे नियम व अटी, याबद्दल सर्व सखोल माहिती दिली. दुसऱ्या दिवसापासूनच काम सुरु करायचे होते. इंटर्नशिपसाठी माझी निवड झाली आहे हे ऐकल्यानंतर खूप आनंद झाला होता, परंतु मनामध्ये एक प्रश्न सतत येत होता काय पाहिलं सरांनी माझ्यामध्ये ज्यामुळे माझी निवड त्यांना करावीशी वाटली ?

सारथीमधून तंबाखू व्यसनमुक्ति वरील पुस्तक,सादरीकरणाचे साहित्य मला मिळाले. या विषयाचा अभ्यास करून, सराव करून एक दिवस सादरीकरण करण्यास सांगण्यात आले. तंबाखू व्यसन करणाऱ्याचे प्रमाण, मृत्यूची संख्या, तंबाखू व्यसन कसे जडते, तंबाखू व्यसन करण्याचे प्रकार, त्याची कारणे, तंबाखू आजार व परीणाम शेवटी उपाय योजना याबद्दल सर्व माहिती सहित्यामध्ये होती. सादरीकरणाची तयारी सुरु झाली. वाघमारे सरांचा समोर सादरीकरण करताना बरेच उच्चार, शब्द चुकत होते. बोलता येत नव्हते. कारण मला कधीच मराठी बोलण्याचा सराव नव्हता. मनात अपमानित झाल्यासारखे वाटल. मी मनानी खचलो.मला काही इंटर्नशिप जमणार नाही, मी त्या दर्जाचा नाही,असे एक ना अनेक विचार मनात येऊ लागले. भिती, स्वतःवरच राग अशा भिन्न भावना मनात उमटत होत्या. वाघमारे सर म्हणाले की, ” एखादी गोष्ट लगेच जमत नाही म्हणून वाईट वाटून घेण्याची गरज नाही. तुझ्यासाठी हि काही मोठी गोष्ट नाही. तु करू शकशील” असा भावनिक आधार सरांनी मला दिला. ज्या वाक्यानी मला सावरलं आणि लढण्याचे बळ हि दिल. मी दररोज सराव, पाठांतर, शब्दाचे स्पष्ट उच्चारासाठी मोठ्याने वाचणे अशा काही तंत्रांचा अवलंब करू लागलो.

सारथीमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्ती भेट देण्यासाठी येतात. भेट देणाऱ्या व्यक्तीमधील एक व्यक्ती म्हणजे सोलापूर आकाशवाणी केंद्राचे नैमित्तिक निवेदक श्रीशैल बिराजदार. त्यांच्यासोबत बोलताना असं समजलं कि, त्यांची देखील भाषा ही कानडी आहे. त्यांनी स्वयं- प्रयत्ननानी शब्दावर पकड निर्माण केली होती. त्यांची आकाशवाणीवरील निवेदनं, मुलाखती मी ऐकु लागलो. हे सगळे त्यांना जमत असेलतर ,मला का जमणार नाही.असा विचार करून मी कामाला लागलो. श्रीशैल बिराजदार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नवीन वाटचालीला सुरुवात केली.

शाळा, महाविद्यालयामध्ये तंबाखू व्यसनमुक्ति जनजागृती कार्यक्रमासाठी परवानगी घ्यायला सुरवात केली. त्यावेळी मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांसोबत कशा प्रकारे बोलावे, परवानगी कशी घ्यावी हे देखील कठीण वाटत होते. अडचण वाटली कि वाघमारे सरांसोबत चर्च करून मार्गदर्शन मी घेत होतो. हळुहळु सवय पडत गेलं. आत्मविश्वास वाढत गेला. माझा कल जास्त ग्रामीण भागात या विषयावर जागृती करणे असा होता. परवानगी घेताना काही शाळेचे मुख्याध्यापक कार्यक्रम घ्यायला परवानगी देत होते. तर काहीजण विद्यार्थ्याची परीक्षा जवळ येत आहे, आम्ही वेळ देऊ शकत नाही असे कारण सांगत होते. काही वेळा आत्मविश्वास खचत होता. सगळेच काही नकार देणार नाहीत असं स्वतःला समजावून प्रयत्न सातत्यात ठेवले. माझ्या कॉलेजला डिसेंबर महिन्यात सुट्टया होत्या. ह्या संधीचा फायदा घेऊन अक्कलकोट तालुक्यात काम करायच ठरवलं. या तालुक्यात जास्त बोली भाषा कानडी आहे. काही प्रमाणात कार्यक्रमाची परवानगी घ्यायला सोपं गेलं. याकालावधीत दिवसाचे नियोजन फार महत्त्वाचं होत. त्यामुळं काटेकोर पणे दिवसाचे नियोजन करू लागलो. प्रथम परवानगी घेणे नंतर सत्र घ्यायला जाणे. असा दिनक्रम सुरू झाला. परवानगी घेतल्यानंतर सत्राला जाताना मुद्द्याचे सराव करायचो. त्याविषयाची उदाहरण, दाखले देण्यासाठी आजूबाजूचे निरीक्षण करणे ते सत्रादरम्यान सांगत होतो त्यामुळे सत्रदेखील उत्तमरित्या होऊ लागली.

तंबाखू व्यसनमुक्ति जनजागृती गरज,. तंबाखू व्यसनाचे प्रकार, तंबाखू व्यसन कसे जडते, तंबाखूमधील घातक रसायने, यावरचे प्रतिबंधात्मक उपाय योजना. याबद्दल संपुर्ण माहिती सत्रात सांगताना विद्यार्थी शांतचित्ताने ऐकत. कॉलेजच्या विद्यार्थ्याचे सत्र घेताना काहीशी भीती वाटत होती. ग्रामीण भागात कॉलेज स्तरावर जाताना सराव भरपूर करून जायचो. कारण आपली चेष्टा कुणी करू नये हा त्यामागचा हेतू होत. शेवटी धाडसाने सत्र घ्यायचो. वाघमारे सरांनी सांगितले होते, “समाजात वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्ती असतात त्यांना सामोरे जाण्याची आपण तयारी ठेवावी. आपण काही त्यांना वाईट सांगत नाही, उलट आपण त्याच्या आरोग्यदायी जीवनासाठी माहिती देत आहोत.” शाळा, कॉलेजमध्ये शिकत असताना, मित्राबरोबर तंबाखू ,गुटखा, सिगारेट हे व्यसन दबावातून कशी जडतात. ह्या बद्दल उदाहरण, दाखले देऊन पटवून देत असे. काही वेळा रोजच्याच जीवनात घडणारे तंबाखूचे परिणाम जसे,सामाजिक, आर्थिक,मानसिक, कौटुंबिक, याबद्दल सांगताना गंभीरतेने विद्यार्थी एकत. सत्रच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात, तंबाखू खाल्यावर कस वाटत? शरीराच्या आत तंबाखू गेल्यावर काय होते? राजु सुपारी खाल्यावर काय होते? सिगारेट ओढनाऱ्याकडून दुसऱ्याला काही त्रास असतो का?” अशा प्रश्नाची अगदी सोप्या भाषेत उत्तर दिल्यामुळे सत्र झाल्यावरही काही विद्यार्थी वर्गाबाहेर येऊन गुटखा दोन- तीन वेळा खाल्लेला आहे. आत्ता मी सोडू शकतो का? असेही प्रश्न विचारायचे. काही विद्यार्थी आमचा कुटुंबात तंबाखू व्यसन जडलेली व्यक्ती आहेत असे ते मान्य करत. त्यांचा गुटखा, तंबाखू सोडविण्याविषयी तुम्ही काय करू शकता असे मार्गदर्शन मी करु लागलो. मुलाकडून दोन- तीन वेळा सत्रामध्ये हसुन- टिंगल टवाळी सुध्दा झाली. तरीही मी डगमगलो नाही.

समुदायस्तरावर तंबाखू व्यसनमुक्ति जनजागृती करण्यासाठी जात असताना,पोस्टर,चिमटे,दोरी इत्यादी साहित्य माझ्या जवळ असायचे. समुदायस्तरावर पोस्टर सादरीकरण करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागे. वेळेचे नियोजन जमतच नव्हत. सकाळी जाव म्हटलं की, सकाळी ग्रामीण भागातील लोक शेतात कामाला जायचे. माझ्यासमोर एकच पर्याय होता, ते म्हणजे संध्याकाळी सातच्या पुढेच कार्यक्रमाचे नियोजन करणे. गावात जाऊन रात्री आठ ते नऊ पर्यंत सत्र घ्यावे लागत असत. समुदायस्तरावरचा अनुभव आगळा- वेगळाच रहायचा. त्या गावातील युवा नेत्याला किंवा ग्रामपंचायत सरपंच यांना भेटून परवानगी घ्यायचो. पोस्टर प्रदर्शन करताना लोकांना या म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा येत नव्हते. लोकांचा प्रतिसाद कमी भेटत होता. एका सत्रांमध्ये असा प्रकार घडला की, मी पोस्टर प्रदर्शन करत होतो. लोक भरपूर जमलेच होते. लोक उत्सुकतेने ऐकत होते. एक व्यक्तीने माझ्यासमोर उभा राहून तंबाखू चोळुन तोंडात टाकली आणि हसून म्हणाला की “तंबाखूमुळे काही होत नाही. तंबाखू मुळे कॅन्सर होत असेल तर मला का? झाला नाही. असं म्हणून तो तेथून निघून गेला. ज्यामुळे मला खूप वाईट वाटले हा व्यक्ती स्वतःच्या व्यसनाविषयी गंभीर तर नाहीच पण जे गंभीरपणे हा विषय समजून स्वतःला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही हो विचलित करून गेला. अशा लोकांमुळेच व्यसन समाजातून समूळ नष्ट होण्यास रोकथाम लागत आहे. समुदायस्तरावर काही अनुभव कटुता, निराशा आणि आशा निर्माण करत होते. शेवटी एकच आपले ध्येय सोडायचे नाही. दुसऱ्याचे काही मनावर घ्यायचे नाही हे मी ठरवलं होत. समुदायस्तरावर वाईट आणि चांगला प्रतिसादाचा अनुभव मिळाला.

या इंटर्नशिप कालावधीमध्ये सारथीने धैर्य,संयम,आत्मविश्वास, जिद्द,चिकाटी, परिश्रम, परिस्थीशी दोन हात करणे, उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर, वेळेचे नियोजन व संवाद अशा अनेक गोष्टीची जाणीव माझ्यात निर्माण केली. माझ्यातील गुण,कौशल्य व उणिवा समजून घेण्यासाठी हि इंटर्नशिप आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. ज्यामुळे समाजातील युवकांची या सामाजिक कार्यात महत्त्व का आहे हे समजले. सारथीचे संस्थापक जावेद नगारे सर आणि रामचंद्र वाघमारे सर वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. जर वाईट प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी परवानगी नाकारली गेली कि अशावेळी तणाव येत होता. आम्ही इंटर्नशिप करणारे इंटर्न म्हणजेच मी, पूजा भालेराव, अक्षय शेवाळे सारथी कार्यालयामध्ये जाऊन वाघमारे सरांसोबत चर्चा करायचो. सराथीमध्ये गेल्यानंतर चांगले वाटायचे. वाघमारे सरांचे बोलने ऐकल्यानंतर, जसे पहिला पाऊस पडल्यानंतर ही सृष्टी बहरते तसे आम्हाला बहरल्यासारखे वाटायचे. आमच्या मनात वाघमारे सरांचे प्रेरणात्मक समुपदेशन ठासून जायचे ज्यामुळे आलेला तणाव आम्ही विसरून जायचो.

“सारथी” या शब्दातच बरेच काही सामावलेल आहे. मला असे वाटतं, महाभारतात जेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्म, समाज संरक्षण करण्यासाठी श्रीकृष्णान अर्जुनाचे सारथी झाले होते, तसेच आजच्या या कलियुगात युवकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जावेद नगारे व रामचंद्र वाघमारे सर सारथ्याचे काम करत आहेत. असे मला वाटतं. सारथीने मला एक व्यासपीठ दिलं. समाजाचे काहीतरी ऋण फेडण्याची संधी दिली. स्वतः मधला आत्मविश्वास, कौशल्य, हार न मानण्याच धैर्य दिल. आयुष्यभर सारथीच्या ऋणीत राहीन. समाजातील युवकांना आवाहन करेन कि, सारथीसारख्या संस्थांच्या सहवासात राहून आपणही सामाजिक योगदान द्यावे.

“सारथी”ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!

– मल्लिकार्जुन हडपद ( इंटर्न – तंबाखूव्यसनमुक्ती प्रकल्प)

]]>
https://sarathiyouthfoundation.org.in/2019/09/28/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4-2/feed/ 0
सारथीच्या कार्याची गरज सांगणारी सत्यकथा https://sarathiyouthfoundation.org.in/2019/09/19/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%b8/ https://sarathiyouthfoundation.org.in/2019/09/19/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%b8/#respond Thu, 19 Sep 2019 06:10:04 +0000 https://sarathiyouthfoundation.org.in/?p=432 सारथी कार्यालयातील फोनची रिंग वाजली. फोन उचलल्यानंतर समोरुन आवाज आला, “मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमची काही लोक आमच्या शाळेत आली होती त्यांनी नंबर दिला होता.”
” कश्याबद्दल प्रश्न विचारायचे आहेत?”
” ते एचआयव्ही बद्दल.”
पुढे बोलण सुरू झालं. एचआयव्ही/एड्स विषयावर बोलायचे आहे असं सांगितलं आणि प्रत्यक्ष बोलताना हस्तमैथुन केल्यानं काही होत का? असा प्रश्न विचाराला. हस्तमैथुन केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे हे ऐकल्यानंतर मोठ्याने श्र्वास सोडल्याचा आवाज फोन मधुन आला. यावरुन समजल कि या प्रश्नाच्या उत्तराने तो किती मोकळेपणा अनुभवतो आहे. यानंतर लगेचच सोबत असलेल्या मित्राला तो म्हणाला, ” बघ मी म्हणत होतो ना याचे काही वाईट परिणाम नसतात म्हणुन.” फोनवरून संपर्क करणारा एकटा नसुन दोघेजण माहिती घेत आहेत हे समजलं. अजून एक प्रश्न विचारायचा आहे विचारु का म्हणत प्रश्न विचारायला सुरुवात केली. विचारा असे म्हणण्याची वाट देखील पाहिली नाही. उत्तर जाणुन घेण्याची आतुरता त्याला थांबु देत नव्हती. “रात्रीच्यावेळी कपडे ओले झाले तर पुढं काही आजार होऊ शकतो का?” स्वप्नअवस्थे संदर्भात त्याला जाणुन घ्यायचे होते. स्वप्नअवस्थेचेही काही दुष्परिणाम नसतात याविषयीची माहिती मिळाल्यानंतर तो खूप आनंदुन गेला. आनंदामध्ये त्याने फोन ठेऊन देण्याची घाई करत म्हणाला, ” बास एवढीच माहिती पाहिजे होती म्हणत त्याने फोन बंद केला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मुलाचा फोन आला. परंतु तो आज एकटाच बोलत होता. “एचआयव्ही कसा होतो मला सांगता का?”
एचआयव्ही होण्याची कारणे ऐकल्यानंतर तो थोडा शांत झाला. जाणवत होते की तो काहितरी विचार करत आहे. “समजा लग्नाच्या आधी एका सोबत संबंध आला आणि लग्नानंतर पुन्हा पत्नीसोबत संबंध आला तर एचआयव्ही होतो का?” त्याने दबलेल्या आवाजात प्रश्न विचारला. नेमका धोका कोणत्या परिस्थितीत होऊ शकतो हे त्याला सांगण्यात आलं. व्यक्तिगत पातळीवर त्याला काही प्रश्न विचारल्यानंतर समजल. तो १९ वर्षांचा आहे. तो सध्या शिकत आहे. त्याचे असुरक्षित शारीरिक संबंध एका महिले सोबत आले होते. त्यामुळे त्याला भिती वाटत होती. काल मित्रासोबत असल्याने हा प्रश्न त्याने विचारला नव्हता परंतु कालपासून याच विषयावर माहिती घ्यायची आहे हे त्याने ठरवले होते. पुर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर समजल कि, शारीरिक संबंधांच्या उत्सुकतेत त्याचे एकदा असुरक्षित शारीरिक संबंध घडले होते. या घटनेनुसार त्यास तपासणीची गरज, कधी व कुठे तपासणी करता येईल याविषयी माहिती देण्यात आली. तपासणी करून घेण्याचे तसेच भविष्यकाळात स्वत:ला सुरक्षित ठेऊ हे त्याने ठरविले आणि तपासणी झाल्यानंतरही संपर्कात राहिन हा विश्वासही त्याने दिला.
सारथी युथ फौंडेशन अंतर्गत २०१० पासुन चालविण्यात येत असलेल्या प्रेरणा प्रकल्पामुळे या युवकास सदर विषयाबाबत माहिती मिळाली आणि आता तो जागरुक झाला आहे. आजही समाजात असे अनेक नव युवक आहेत ज्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहचलेली नाही. आज या युवकापर्यंत सारथीच्या माध्यमातून माहिती पोहचली नसती तर त्याला समजलं हि नसतं कि तो धोक्याच्या पातळीत असु शकतो कि नाही. म्हणुनच सारथीच्या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय व समुदाय स्तरावर मानवी लैंगिकता, एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग विषयावर जनजागृती करण्याचे काम केल जात आहे.

]]>
https://sarathiyouthfoundation.org.in/2019/09/19/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c-%e0%a4%b8/feed/ 0