सारथी ही माझ्या करिअरसाठी यशाची पायरी…

मला सारथी विषयी लिहिताना खूप आनंद होत आहे. कारण कि मी या संस्थेशी २०१३ सालापासून जोडलेली आहे. ही संस्था मला माझ्या शैक्षणिक क्षेत्रात एक विशेष भाग म्हणून लाभली होती. खर म्हणजे माझी ह्या संस्थेमध्ये एमएसड्ब्लु ह्या कोर्सचा अभ्यास करत असताना क्षेत्रीयकार्य करण्यासाठी पाठवणी झाली होती. त्यावेळी सुरूवातीला माझी ओळख जावेद नगारे सर, सुदर्शना भंडारी मॅडम […]

जगण्याचा अर्थ समजवणारी सारथी….

सारथी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची सुरुवात कशी झाली हे पण आपल्याला माहिती आहे.  संकटातून वाट काढून तिने आपले नाव केले. या नावातच याचा अर्थ  दिसून येतो. सारथी आपल्यासाठी नवीन नाही सोलापूर आणि महाराष्ट्र मध्ये तिचं नाव आपल्याला दिसून येते . सारथीचे काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज मला सारथी सोबतचे माझ वैयक्तिक नाते कसे निर्माण […]

आणि मी व्यसनमुक्त झालो…

भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्यसन हे असतेच. मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना. व्यसनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने धुम्रपान करणे, मद्यपान करणे, इंजेक्शनच्या हे आणि ह्या स्वरुपातील व्यसन. काही वाईट व्यसन असतात, तर काहींना चांगले देखील व्यसन असतात. यामध्ये प्रामुख्याने म्हणायच तर व्यायाम करुन उत्तम शरीरयष्टी कमविण्याच व्यसन, सातत्याने वाचन, लिखाण करण्याच […]

अनुभवपूर्ण सारथी फेलोशिप….

समाजकार्याची आवड तर होती पण नेमक काय कराव? या संभ्रमात मी होते. माझ शिक्षण तर यातच सुरू आहे मग मी अस काय करू ज्याच्यातून मी समाजासाठी काही तरी करू शकेन? यातच मे महिन्यात माझ्या मित्राचा शोएब शेख यांचा मला फोन आला. त्यांनी मला सारथी यूथ फौंडेशन सोलापूर मधील फेलोशिपबद्दल सांगितले. फेलोशिपच ऐकून कुठे तरी माझ्या […]

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त…..

नमस्कार, सर्वप्रथम गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!! राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना व्यसनमुक्त भारताचे पुरस्कर्ते म्हणून आपण ओळखतो. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त सारथी युथ फौंडेशन, सोलापूर अंतर्गत चालविल्या जात असलेल्या व्यसनमुक्ती प्रकल्पामधील एक सत्य अनुभव कथा आपणासमोर मांडत आहे. स्वत: साठी तंबाखू व्यसनमुक्त होताना… लोधी गल्ली सोलापूर शहरातील असे ठिकाण जिथ मोठ्याप्रमाणात विडी बनविणार्‍या कामगारांची घरे […]

सारथीचे सारथ्य समजून घेताना माझ्यातील बदल

नमस्कार,वाचक हो मी या लेखात माझे काहीं अनुभव लेखन करीत आहे. महिना ऑक्टोबरचा होता. पुजा भालेराव या माझ्या कॉलेज मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली “सारथी युथ फाऊंडेशन सोलापूर या सामाजिक संस्थामध्ये, तंबाखू व्यसनमुक्ति या प्रकल्पा अंतर्गत इंटर्नशीपसाठीची जागा भरावयाची आहे. तुझी इच्छा आहे का इंटर्नशिप करण्याची ? अर्ज करण्याचा आजचा शेवट दिवस आहे.” खरंच मित्रांनो […]

सारथीच्या कार्याची गरज सांगणारी सत्यकथा

सारथी कार्यालयातील फोनची रिंग वाजली. फोन उचलल्यानंतर समोरुन आवाज आला, “मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमची काही लोक आमच्या शाळेत आली होती त्यांनी नंबर दिला होता.” ” कश्याबद्दल प्रश्न विचारायचे आहेत?” ” ते एचआयव्ही बद्दल.” पुढे बोलण सुरू झालं. एचआयव्ही/एड्स विषयावर बोलायचे आहे असं सांगितलं आणि प्रत्यक्ष बोलताना हस्तमैथुन केल्यानं काही होत का? असा प्रश्न […]